धरणगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी व पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने जवळपास ५४ कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी, तहसीलदार धरणगाव नितीन कुमार देवरे, वैद्यकीय अधिकारी प्रकाश सोनवणे, पथकाने तात्काळ शिबिराचे आयोजन करुन कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले. यावेळी मंडळाधिकारी अमोल पाटील, कोतवाल बांबोरी नारायण सोनवणे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हजर होते.