TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुप्तधनासाठी खड्डा खोदायला केली सुरुवात, पण अचानक घडलं भयंकर ; एकाचा मूत्यू !

महिनाभरानंतर उलगडले घटनेचे रहस्य ; स्वप्नात घरातील गुप्तधन दिसत असल्याचा एकाला व्ह्यायचा भास !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2023
in गुन्हे, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) वाशीम जिल्ह्यातील दारव्हा येथे गुप्तधनासाठी खोदकामादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यू दडपण्यासाठी मृतदेह त्याच्याच शेतात फेकून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला होता. मयताला चांगले पोहता येत असल्यामुळे विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू कसा काय होऊ शकतो, हा प्रकार घातपाताचा असावा, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. अखेर महिनाभरानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. देवराव रामजी बदुकले (५२, रा. शिवाजी चौक) असे मृताचे तर प्रशांत विठोबा चिरडे, गंगाधर किसन नेवारे दोघेही ( रा. दारव्हा), विनेश रामजी कारिया ( रा. कारंजा लाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गुप्तधनाचे कनेक्शन आले समोर !
या संदर्भात अधिक असे की, दारव्हा येथील कारंजा रोडवरील शेतातील विहिरीत ६ सप्टेंबर रोजी देवराव बटुकले यांचा मृतदेह आढळून आला होता. मात्र मृतकाला पोहणे येत असल्याने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला. गुप्तधनाचे कनेक्शन समोर येत असल्याने पोलिसांनी दारव्ह्यातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

विनेश सांगायचा मला स्वप्नात घरातील गुप्तधन दिसते !
विनेश कारियाने प्रशांत चिरडेला स्वप्नात घरातील गुप्तधन दिसत असल्याचे सांगितले होते. त्यावरून दोघांनी गुप्तधन काढण्याचे ठरविले. विश्वासातील दोन खोदकाम करणारे माणसं आणण्याची जबाबदारी प्रशांतवर सोपविली. २३ ऑगस्टला देवराव बदुकले व गंगाधर नेवारे यांना कारंजा येथे सोबत नेऊन खोदकाम केले. परंतु त्यानंतर देवराव बदुकले यांची सासू आजारी असल्याने व नंतर तिचा मृत्यू झाल्याने काही दिवस खोदकाम थांबविले. त्यानंतर पुन्हा प्रशांत ३ सप्टेंबर रोजी मृतकासह गंगाधरला कारंजा येथे घेऊन गेला. सुमारे आठ फुटांच्या खोल खड्डयात आडवे दहा फुटांचे भुयार खोदण्यात आले. मात्र, त्याचवेळी वरील जमिनीचा ढाचा कोसळून त्यात देवराव बटुकले यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या तिघांनी मृतदेह तिथेच सोडून पळ काढला.

सायंकाळी दारू ढोसली, नंतर मृतदेह फेकला विहिरीत !
प्रशांत व गंगाधरने दुचाकीने दारव्हा येवून सायंकाळी बारमध्ये दारू ढोसली. जेवण केल्यानंतर चारचाकीचा बंदोबस्त करून मृतदेह दारव्हा येथे आणला. कारंजा रोडवरील मृतकाच्या शेतातील विहिरीतच मृतदेह, चपला, मोबाइल फेकून दिला. त्यानंतर काही घडलेच नाही, या अविर्भावात फिरत होते. परंतु, पोलिसांनी चौफेर तपासातून या प्रकरणाचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०४, २०१ सह महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानूष अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोना प्रतिबंध, उच्चाटन कायदा २०१३ चे कलम ३ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्तीसाठी घेतली ३५ हजाराची लाच ; दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक भाषेत बोलू शकतो, पण ही माझी संस्कृती नाही ; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर !

February 21, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महायुतीचे काळे कारनामे पुस्तिकेचे वितरण

August 29, 2024

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

July 12, 2025

धरणगाव तालुका मागासवर्गीय महिला सेना तालुका प्रमुखपदी मायाताई देवरे !

January 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group