धरणगाव (प्रतिनिधी) सध्या उन्हाळ्याच्या सुटी सुरू असल्यामुळे बालकांवर आध्यात्मिक संस्कार व्हावे यासाठी तालुक्यातील सोनवद ग्रामस्थांनी २० ते ३० मे असे दहा दिवस गावातील स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची उपस्थिती हाती.
चौथी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वारकरी बालसंस्कार शिबिरात प्रवेश मिळणार आहे. शिबिरात प्राणायाम, प्रार्थना, हनुमान चालीसा पठण, गायन, पखवाज वादन, मराठी व्याकरण, हरिपाठ, वारकरी पावल्या, श्रीमद् भागवत गीतेची संहिता शिकवली जाणार आहे. या शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शिबीरासाठी विशेष सहकार्य केले आहे.