जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेत मार्फत खान्देश सेंट्रल मॉल येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय वीस वर्षातील मुले आणि मुलींच्या निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर मुलींमध्ये सहा गुण घेत जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा पुष्कर ढेरे हे आघाडीवर आहेत. पाच गुण घेऊन मुलींमध्ये दहा वर्षाची नागपूरची वेदिका पाल एकमेव खेळाडू द्वितीय स्थानावर असून मुलांमध्ये सहा खेळाडूंनी पाच गुण मिळवलेले आहेत. यात ठाण्याचा श्रेयस गाडी मुंबईचा जीत शहा साताऱ्याचा साहिल शेजन ठाण्याचा प्रथमेश दिवेकर व जळगावचा आयुष्य विद्यार्थी यांचा समावेश आहे.
आज गुरुवार या स्पर्धेच्या अंतिम दिवस सकाळी आठ वाजता सातवी फेरी तर दुपारी दोन वाजता आठवी फेरी होणार असून लागलीच पाच वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल. पारितोषिक वितरण समारंभासाठी जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख यांची उपस्थिती राहणार आहे
पाचवी फेरी
पाचव्या फेरिला शुभेच्या देण्यासाठी एम जे कॉलेज जळगाव चे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. त्यांच्या सोबत प्रमुख उपस्थिती म्हणून इंदु कम्प्युटरचे दीपक वडनेरे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, महाराष्ट्र पंच कमिटीचे सचिव प्रवीण ठाकरे ,स्पर्धेचे मुख्य पंच नाशिक चे मंगेश गंभीरे व जैन स्पोर्टस् अकॅडमी चे बॅडमिंटन प्रशिक्षक किशोरसिंग यांची उपस्थिती होती.
सहावी फेरी
सहावी फेरी साठी डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीड़ा संचालिका प्रो डॉ अनिता कोल्हेसह नागपुरचे ईश्वर नागपूरे, चंद्रशेखर देशमुख, विवेक दाणी यांची उपस्थिति होती अतिथीचे स्वागत किशोरसिंग, प्रवीण ठाकरे व नंदलाल गादिया यांनी केले.
५व्या व ६ व्या फेरिचे महत्वपूर्ण निकाल
पाचव्या फेरी अखेर मुलांच्या गटात कडवी लढत पहावयास मिळली.
★अग्रमानांकित पुष्कर डेरे व श्रेयस घाडी हे संयुक्त पणे ५ गुणांसह आघाडीवर होते त्यात तब्बल ११ जण ४ गुणांसह द्वितीय स्थानावर होते.
★पहिल्या पटावर अतिशय उत्कंठावर्धक सामना बुद्धिबळ प्रेमींना आज पहावयास मिळाला. ‘किंगस् इंडियन अटॅक’ या क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या ओपनिंग समोर भक्कम बचाव करीत जीत ने पुष्कर समोर कडवी आव्हान उभे केले. पण ८० चालीपर्यंत चाललेल्या या लढतीत डावाच्या अखेरीस पुष्कर डेरे च्या हत्तींच्या तांत्रिक हाताळणी समोर जीत ला शरणागती पत्करावी लागली.
★दुसऱ्या पटावर श्रेयस ने क्वीन्स गाम्बिट डिक्लाइन या बचाव पद्धतीचा अवलंब केल्याने अवघ्या ३८ चालीत आशिष ला पराभूत केले.
★मुलींच्या गटात जळगावच्या भाग्यश्री ने ५ गुणांसह निर्विवाद आघाडी घेतली असून साडे चार गुणांसह मुंबईची क्रीती पटेल द्वितीय आणि चार गुणांसह औरंगाबादची राधिका तिवारी, नागपूर ची वेदिका पाल व पुण्याची तन्वी कुलकर्णी या संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
अग्रमानांकित भाग्यश्री पाटील ने मुंबईच्या युती पटेल कडील पांढरा राजाला आपल्या वजीर व हत्तीने जेरीस आणत ह२ घरावर घणानाती हल्ला चढवला आणि तिला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
★अंतिम वृत्त हाती आले तेंव्हा मुलांच्या गटात पुष्कर डेरेने निर्विवादपणे ६ गुणांसह आघाडी घेतली असून मुलींच्या गटात पहिल्या पटावर भाग्यश्री ने अपेक्षेप्रमाणे क्रिति वर मात करीत ६ फेऱ्यांपैकी ६ गुण मिळवित घौडदौड चालू ठेवली
★ दुसऱ्या पटावर वेदिका पाल या चिमुकल्या खेळाडूने खळबळजनक विजय नोंदवित ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.