धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पाणी व आरोग्याचा विषय खूप गंभीर झाला आहे. अनेक वर्षांपासून गावातील नागरीक पाण्यासाठी त्रस्त आहेत. यासंदर्भात भाजपच्यावतीने उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रमुख यांना भारतीय जनतापार्टी कडून निवेदन देण्यात आले की, अनेक वर्षांपासून गावातील नागरीक पाण्यासाठी त्रस्त आहेत अजून २० ते २२ दिवस नळाला पाणी येत नाही. गेल्या ३ महिन्यापासून नगर पालिकेतील सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहे. ऐन दिवाळीच्या वेळीस देखील पाण्यासाठी भटकावे लागले. अंजनी नदीचे जे पाणी उचल करून देण्यात आले होते. तो पाणी पुरवठा अतिशय अशुद्ध व निळसर होता. त्यामुळे शहरात विविध आजारांचे रुग्ण वाढले ज्यात निमोनिया व टायफॉईड चे रुग्ण अधिक होते. या आवर्तनात नळाला आलेले पाणी सर्वानी मिळून आणले आहे. मागील वेळेस देखील आम्ही किशोरराजे निंबाळकर यांना पाणी विषयात निवेदन दिले होते. परंतु काही उपयोग झाला नाही आता तुम्ही जातीने लक्ष घालून प्रश्न मिटवावा, असे निवेदनात म्हंटले आहे.
धरणगावात २०० ऑक्सिजन व १० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावी
शहरात सध्या कोरोनाने कहर माजविलेला आहे. गेल्या महिन्यापासून तालुक्यात कोरोना व निमोनियाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील रुग्ण जळगाव, धुळे, नाशिक, अमळनेर, भुसावळ, चोपडा, एरंडोल, पारोळा अशा ठिकाणी उपचार घेत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूची संख्या तालुक्यात वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून धरणगाव शहरात २०० ऑक्सिजन व १० व्हेंटिलेटर बेडची अतंत्य आवश्यकता आहे. त्यासाठी संपूर्ण अधिकारी कर्मचारीसह सेंटर उभारावे ही मागणी भारतीय जनता पार्टी पुन्हा करत आहे. निवेदन देते वेळी भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, तालुका सरचिटणीस ललित येवले, जेष्ठ नगरसेवक शरद कंखरे, शहर सरचिटणीस कन्हैया रायपूरकर आदींनी कोरोनाचा नियमांचे पालन करून प्रतिनिधिक स्वरूपात निवेदन देण्यात आले.