धरणगाव : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील अयोध्या नगरात एका घराबाहेर लावलेली महिंद्रा बालेरो गाडी अज्ञात चोरट्याने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, गोविंदा रामचंद्र मिस्तरी (वय-५७) हे धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील अयोध्या नगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गोविंदा मिस्तरी यांनी त्यांची १ लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो कंपनीची कार (२०११ चे मॉडेल जुने वापरते) क्र एम एच १९ एएक्स ७०९८ आपल्या घराबाहेर लावलेली होती. दरम्यान दि. २ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास महिंद्रा बालेरो कार एका अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकों नितीन पाटिल हे करीत आहेत.