भुसावळ (प्रतिनिधी) अनधिकृत वाणिज्य अकृषिक वापर बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ममन इलियास इकबाल सेठ यांनी भुसावळ तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ममन इलियास इकबाल सेठ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ येथील सर्वे नं- ५४/५/६ प्लॉट अख्तर पिंजारी यांच्या मालकीचे आहे. तरी सदरच्या जागेवर अख्तर पिंजारी हे वापर करत आहे व सदरचे वाणिज्य वापर हे विना परवानगी व अटी शर्ती नुसार करीत नसून तरी सदर जागेवर विना परवानगीचे वाणिज्य आकृषिक वापर बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे यात म्हटले आहे.