पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) गावात किरकोळ वादातून दोन गटात १३ मार्च रोजी रात्री जोरदार राडा झाला होता. यातून परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या असून विविध कलमान्वये दोन्ही गटातील तब्बल २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या तक्रारीत पिडीत महिलेने म्हटले आहे की, १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे पती घरासमोर दुचाकी लावत असतांना प्रकाश पाटील, राकेश पाटील, गजानन पाटील,संदीप पाटील, बापू नन्नवरे, सागर नन्नवरे, प्रफुल्ल पाटील, मनोज पाटील, गोलू पाटील, नितीन पाटील, विक्की पाटील, जितु पाटील, भैय्या सोनार, बापू पाटील व इतर महिला अशा एकून २४ जणांनी अश्लील शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करून, तुम्ही गावात राहू नका अन्यथा तुम्हाला चाकूने मारून टाकू अशी धमकी दिली. दुसऱ्या तक्रारीत पिडीत महिलेने म्हटले आहे की, १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चंद्रशेखर शामराव साळुंखे याने महिलांना लज्जा उत्पन्न होईल अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी चंद्रशेखर साळुंखे, गौतम साळुंखेसह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ गजानन महाजन तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर हा वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.