TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी समाजशील नागरीक बनावे : ना. गुलाबराव पाटील !

जळगाव जिल्हा चर्मकार समाजाने केला १७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून हा अविस्मरणीय असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील राधा कृष्ण मंगल कार्यालयात गुरू रविदास क्लब, संत रोहिदास प्रतिष्ठान व संत शिरोमणी रविदास बहुद्देशीय संस्था यांचे वतीने आयोजित जळगाव जिल्हा चर्मकार समाज गुणवंत गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राजुमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, राजेंद्रजी बावस्कर, संजय खामकर, भानुदास विसावे, नगरसेविका सौ. सुरेखा तायडे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने , मुख्याधिकारी गजानन तायडे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, ऍड .शैलेंद्र पवार, चेतन तायडे, विश्वनाथ सावकारे, वसंत नेटके, यशवंत ठोसरे, विजय पवार, सुरेश सोनवणे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनीभविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.

सुरुवातीला गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व समाज संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन दांडगे व प्रा. स्मिता जयकर यांनी तर संजय वानखेडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गुणवंतांचा झाला सत्कार !

यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचापालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे 2001, 1500 व 1001रु. अशा रोख रकमेसह सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दहावी, बारावीतील अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व रोख दोनशे रुपये देऊन गौरविण्यात आले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवेशित विद्यार्थ्यांना राजेश वाडेकर यांचे वतीने प्रत्येकी एक हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी तेसाठी यांनी घेतले परिश्रम !
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विठ्ठल सावकारे, डॉ. सुनील निंभोरे, प्रकाश रोजतकर, निवृत्ती सूर्यवंशी, जगन्नाथ निंभोरे, गणेश सूर्यवंशी, कैलास वाघ,अरुण नेटके, रवी नेटके, प्रदीप शेकोकार परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्रशांत सोनवणे व जगन्नाथ निभोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाज बांधवांनी, कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

तेरी मेहरबानियाँ...मालकाचे प्राण वाचवण्यासाठी कुत्रा भिडला अस्वलासोबत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Railway Jobs : रेल्वेत नोकरी शोधताय? ; जाणून घ्या..प्रत्येक रँकनुसार प्रोसेस आणि पगार !

January 27, 2022

लसीकरणासाठी सक्ती करण्यात येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

May 2, 2022

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021

राष्ट्रवादीचे विनोद देशमुख पक्षातून निलंबित

October 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group