धरणगाव (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच धरणगावात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला आज नवे 18 मंत्री मिळाले आहेत. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी पार पडला. त्यात चंद्रकांत पाटील,विजयकुमार गावित,गिरीश महाजन आणि त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. दरम्यान, धरणगावात आज गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ढोल ताशे वाजवत मोठा जल्लोष केला. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर छोटी रॅली काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, राजेंद्र महाजन, अभिजित पाटील,भगवान महाजन, वाल्मिक पाटील, राजेंद्र चौधरी, तौसीफ पटेल, बूट्या पाटील, भैय्याभाऊ महाजन यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.