जालना (प्रतिनिधी) येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेली जालना नगर परिषद निवडणूक लढण्याचा निर्णय स्वाती राहुल पवार यांनी घेतला आहे. स्वच्छता,विज,पाणी, रस्ते यासह नागरिकांना येणाऱ्या इतर अडी-अडचणी सोडविणार असल्याचे स्वाती राहुल पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मागील कोरोना काळात स्वाती पवार यांनी प्रभाग क्रं. २३ मधील गोर-गरीब लोकांना अन्न-धान्य, किराणा किट यासह अनेक समस्या सोडविण्याचे काम केले आहे. संकटकाळात नेहमी धावून येणाऱ्या स्वाती पवार यांना येथील नागरिकांनी नगर पालिका निवडणूक लढविण्यासाठी पुढे केले असून येथील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे देखील येथील नागरीकांनी बोलून दाखविले आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून या प्रभागातील नागरिकांना येणाऱ्या अडी-अडचणी तसेच या प्रभागातील साफ सफाई, पाणी, विज यासह अनेक प्रश्न स्वतः च्या खर्चाने सोडविण्याचे काम स्वाती पवार यांनी केले आहे.
मधुबन कॉलनी डबलजीन, सिंगलजीन प्रभाग क्रं. 23 मध्ये सद्याचे नगरसेवक महाविर ढक्का आणि सौ. संध्या देठे हे असून महाविर ढक्का यांनी या प्रभागात अनेक विकास कामे केलेली आहेत. परंतू सौ. संध्या देठे यांनी कुठलेच विकास कामे केलेले नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
स्वाती पवार यांनी पत्रकात नमूद केले आहे की, आपण नगर परिषद निवडणूक लढवणार आणि या प्रभागतील बेरोजगार युवकांचा व गोर-गरीब कुटूंबाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणार असे एक ना अनेक प्रश्न आपण सोडविणार असेल्याचे त्यांनी सांगितले.