TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम राबविण्यास मंजूरी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या १६ कलमी कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र जिल्हा परिषदेकडील निधी अखर्चित राहतो. त्यामुळे विकास कामे उशीरा होतात. यापुढे प्रशासकीय बाबी वेळेत न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. जळगाव शहरातील २० किमोमीटर लांबीच्या रस्त्यांबाबत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यात यापूर्वी राबविलेल्या पालकमंत्री सुरक्षा कवच योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महावितरणमार्फत वीजबीलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्श्यन खंडित करण्यात येत असल्याची बाब लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतचा प्रश्न आगामी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. तसेच स्ट्रीट लाईट व नळपाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित करु नये यासाठी शासनास विनंती करणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असल्याने जे रस्ते खराब झाले आहे ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बॅकेकडे जमा करुनही ज्या बँकांनी विमा कंपनीकडे रक्कम जमा केली नाही. त्या बँकावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न मार्गी लागावा याकरीता प्रथमच जिल्हा वार्षिक योजनेतून ४३५ ट्रान्सफार्मरसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून या आर्थिक वर्षातही २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली. जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगतानाच प्रशासकीय यंत्रणांनी विकासात्मक कामे करतांना लोकप्रतिनिधीशी समन्वय ठेवून कामे वेळेवर व चांगल्या दर्जाची होतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिलेत.

बैठकीच्या प्रास्तविकात नियोजन समितीचे सदसय सचिव तथा जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूचना केली.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ या वर्षासाठी मंजूर नियतव्यय ५३६ कोटी ५ लाख ५१ हजार रुपयांचा असून आतापर्यंत २१७ कोटी ५० लाख रुपये बीडीएसवर प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत ४२ कोटी ६४ लाख ८ हजार रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरीत केला असून आतापर्यंत ३६ कोटी ९२ लाख ४५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीच्या सुत्रसंचलनात जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनीदिली.

या बैठकीत समितीच्या २९ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास व अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मध्ये माहे मार्च-२१ अखेर झालेल्या (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) खर्चास मंजुरी देण्यात आली. शिवाय जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ मध्ये माहे जुलै-२१ अखेर (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र) झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तर नियोजन विभाग, शासन निर्णय दि. २८ एप्रिल, २०२० नुसार सन २०२०-२१ मध्ये मंजुर नियतव्यय रु. ३७५ कोटीच्या २५ टक्केच्या मर्यादेत कोविड-१९ उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या ४४ कोटी ९ लाख १६ हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी व नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक १९ एप्रिल २०२१ नुसार सन २०२१-२२ साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये ४०० कोटीच्या ३० टक्के रक्कम रुपये १२० कोटी निधी कोविड-१९ उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विकासात्मक सुचना तसेच सुचविलेल्या कामांवरही चर्चा करुन त्यांचा आढावाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. या बैठकीस आमदार सर्वश्री. संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांचेसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीवर नव्याने नियुक्त झालेले विशेष निमंत्रित सदस्य व नामनिर्देशित सदस्यांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला ; ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, जुलै ३ ते १० जुलै २०२२ 

July 3, 2022

पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार ; पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा

January 9, 2022

जळगाव जिल्ह्यात आठ ठिकाणी अवैध सावकारांवर छापे

August 18, 2021

धरणगावात समता परिषदेच्यावतीने “ओबीसी आरक्षण पे चर्चा”

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group