जळगाव (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ इलाईट व जळगाव जिल्हा पोलीस दल, पोलीस स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ दिवसीय ‘स्वयंसिद्धा’ (सेल्फ डिफेन्स कोर्स) चा शुभारंभ करण्यात आला. यात ४५ युवती व महिलांनी सहभाग घेतला आहे.
डाॅ. वैजयंती पाध्ये यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रोटरीचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप आसोदेकर, शिरीष बर्वे, मनीषा पाटील, योगीता ढाके, चारुशीला इंगळे आदी उपस्थित होते. प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, अश्विनी जंजाळे व जागृती काळे यांचे सहकार्य लाभले.