धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर टीकात्मक विडंबन केले होते. तर पाकिस्तानचे बिलावल झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच्याच निषेधार्थ आज अंत्ययात्रा काढून दोघांचा पुतळा जाळण्यात आला.
यावेळी तिरडीला नगराध्यक्ष कल्पना महाजन व महिला शहराध्यक्ष भारती चौधरी यांनी खांदा दिला. तर आंदोलनाचे नेतृत्व भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजयभाऊ महाजन,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, पप्पू भावे, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष मायाबाई सोनवणे यांनी केले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन पाटील यांच्यासह भाजप, बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि ह.भ.प.जितु महाराज ह.भ.प.आर.डी. महाजन,गोलू महाराज, विलास महाजन,वाल्मिक पाटील, भैय्याभाऊ महाजन आदी उपस्थित होते.