धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अँड. रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्लेखोरांवर कारवाई करणे बाबत धरणगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, पुष्पाताई महाजन, धनराज माळी, दीपकभाऊ वाघमारे, नाटेश्वर पवार, रावीदादा पाटील, मोहन पाटील सर, अरविंद मानकरी, एन डी पाटील, अरविंद देवरे, सुरेखा पाटील, प्रदीप पाटील, क्रांतिकुमार कोळी, सागर वाजपेयी, सीताराम मराठे, शामकांत पाटील, शालीग्राम पाटील, धनराज पाटील, गौतम सैनदाने, आकाश राणे, बिलखेडा सरपंच बंडू काटे, भवरखेडे सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, लोटन पाटील, एन पी गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, निलेश पाटील आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
















