जळगाव : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूंग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे व मार्केट फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे.
ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी व आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर मूग, उडीद व सोयाबीन हा शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, संजय व उपाध्यक्ष रोहीत दिलीप निकम तसेच सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे- पाटील (भा.प्र.से.) व सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी आवाहन केले आहे.
आधारभूत दर खालील प्रमाणे
मूग – ८६३२ रुपये
उडीद – ७४०० रुपये
सोयाबीन – ४८९२ रुपये