धरणगाव (प्रतिनिधी) शासकीय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धरणगाव येथे घेण्यात आली.
प्रास्ताविक अँग्लो उर्दू हायस्कूलचे क्रीडाशिक्षक मुश्ताक अली सैय्यद यांनी केले. अध्यक्षस्थानी अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख मुख्याध्यापक शेख शकीलुद्दिन होते. या स्पर्धेचे उद्घाटन तालुक्याचे क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लिटल ब्लॉझम स्कूल व अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, धरणगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी, जितेंद्र ओस्तवाल, पवन बारी उपस्थित होते. सूत्रसंचालन परवेज शेख तर आभार प्रदर्शन अकील खान यांनी केले.