TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या ऐतिहासिक मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला गुरुवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० गडी राखून विजय मिळवून दिला.

भारतापुढे विजयासाठी ४९ धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताने विकेट न गमावता लक्ष्य गाठले. रोहित शर्मा (नाबाद २५) याने विजयी षटकार ठोकला तर शुभमन गिल १५ धावा काढून नाबाद राहिला. तर सामन्यात एकूण ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षरने गृहमैदानावर दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ बळी घेतले. त्याने सामन्यांत एकूण ७० धावांत ११ फलंदाजांना बाद केले. अश्विनने ४८ धावांत ४ बळी घेतले आणि ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ८१ धावांत गारद झाला. भारताविरुद्ध त्यांची ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली. इंग्लंड या पराभवामुळे फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. भारताने ४ मार्चपासून सुरू होणारा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राखला, तरी जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये खेळण्याचा हक्क मिळवेल.

READ ALSO

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी एकूण १७ बळी गेले. भारताने पहिल्या सत्रात ३ बाद ९९ धावसंख्येवरून पुढे खेळताना १४५ धावा केल्या आणि पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावा केल्या होत्या. त्यांनी दुसऱ्या डावात भारताविरुद्ध आपली नीचांकी धावसंख्या नोंदवली. यापूर्वीचा रेकॉर्ड १०१ होता. ही धावसंख्या त्यांनी १९७१ मध्ये ओव्हरमध्ये नोंदवली होती.

खेळपट्टीचे स्वरूप असे होते की, इंग्लंडचा पर्यायी ऑफ स्पिनर जो रुटने ८ धावांत ५ बळी घेतले, तर जॅक लीचने ५४ धावांत ४ फलंदाजांना माघारी परतवले. रुटने दुसऱ्या डावात गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या अक्षर पटेलने नव्या चेंडूने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ बळी घेतले. भारतातर्फे पहिल्या डावात रोहित शर्माने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२ व्यांदा कसोटी सामना दोन दिवसांत संपला. भारतात असे दुसऱ्यांदा घडले. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने अफगाणिस्तानचा बेंगळुरूमध्ये दोन दिवसांत पराभव केला होता. गुरुवारी संपलेल्या लढतीत केवळ १४०.२ षटके गोलंदाजी झाली. षटकांचा विचार करता सर्वांत कमी षटके टाकण्याच्या बाबतीत हा कसोटी सामना सातव्या क्रमांकावर आहे. अहमदाबादची ही टेस्ट जिंकल्यामुळे भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. आता शेवटची टेस्ट ड्रॉ झाली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.

कोहलीने मोडला धोनीचा विक्रम

इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवित विराट कोहली भारतात सर्वाधिक विजय नोंदविणारा कर्णधार ठरला. त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कोहलीने २९ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २२ विजय मिळविले आहेत. धोनीने ३० कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २१ विजय मिळविले आहेत.

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी कारकिर्दीत ४०० बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा अश्विन अनिल कुंबळे, कपिलदेव व हरभजन सिंग यांच्यानंतरचा चौथा भारतीय गोलंदाज, तर क्रिकेटविश्वातील सहावा फिरकीपटू ठरला. सर्वात कमी कसोटींमध्ये अशी कामगिरी केलेला अश्विन दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनने ७७ कसोटींत ही कामगिरी केली असून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ७२ कसोटींत हा पराक्रम केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उमवित नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु ; ॲड. कुणाल पवार यांनी मानले विद्यापीठ प्रशासनाचे आभार !

July 19, 2023

काय सांगता ! आकाशातून पडला २ किलोचा सोनेरी दगड !

September 25, 2021

वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला !

December 19, 2024

अपघाताची जाणीव होताच बापाने मुलाला वाचवण्यासाठी बाजूला ढकलले ; मुलाचे प्राण वाचले, पित्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group