TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

१५ संघांतील ६८५ महिला गोविंदांचा सहभाग*; *प्रत्येक गोविंदाला १० लाखांचा अपघाती विमा

vijay waghmare by vijay waghmare
August 29, 2026
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष… अशा अनोख्या संगमातून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड), जळगाव येथे रंगणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शाळा-महाविद्यालयांच्या १५ संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा सहभागी होणार आहेत.

‘नारीशक्तीचा गजर, दहीहंडीचा थरार’ ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. युवतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा उपक्रम अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध करण्यात आला आहे.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

ढोल-ताशांचा निनाद अन् २१३ ढोलवादकांचा दणदणाट

दहीहंडीच्या थरारासोबतच कार्यक्रमात विविध आकर्षणांची रेलचेल असणार आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरणात उत्साह निर्माण करणार आहेत. यासोबतच मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच शहरातील १५ रिल्स स्टार युवतीही दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होणार असून, त्यांच्या सहभागामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. पारंपरिक दहीहंडीला आधुनिक मनोरंजनाची जोड देत हा सोहळा जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

‘संस्कृतीची जाण, उत्सवाची शान’

‘महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी’ अशी ओळख निर्माण केलेल्या या उपक्रमामागे युवतींच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. पारंपरिक सण-उत्सवांमध्ये युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस आणि निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘देऊया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रवेश विनामूल्य

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला आणि उत्साहाला दाद द्यावी, असे आवाहन भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThrilling all-female Dahi Handi event at Shivteerth on September 5!

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
Next Post

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा !

November 13, 2023

भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचं नाव बदललंय : उद्धव ठाकरे

March 3, 2021

मोठी बातमी : शिंदे गटाची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव ; निवडणुक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती न देण्याची मागणी !

September 6, 2022

‘सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही’ ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

September 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group