TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत ८८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने पोलिसांनी सुपेंच्या घरातून हस्तगत केलं आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले.

शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये अटक आरोपी तुकाराम सूपे याचेकडून आणखीन जप्त मुद्देमाल

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे सन २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रता परिक्षामध्ये त्यांनी परिक्षार्थी कडून पैसे स्विकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करून त्यांना पात्र केले होते. त्याअनुषंगाने गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्हयामध्ये सायबर पोलीसांनी दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करुन त्यांची पुढील तपासकामी दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. तत्पूर्वी दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामदेव सुपे यास अटक करुन तात्काळ त्याचे घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्ती पैकी ८८,४९,९८०/- रु रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले ५ ग्रॅम सोन्याचे नाणे, ०५ तोळयाचे दागिने व ५,५०,०००/- रुची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

तुकाराम सुपे यांच्या जावई व मुलीची कसून चौकशी

त्यापुढे आरोपीचे पोलीस कोठडीतील तपासादरम्यान आरोपीताने पैशाच्या दोन बॅगापैकी त्याचे मुलीकडे एक पैशांची बॅग ठेवल्याची तसेच त्याचे जावयाने त्याचे मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीताचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना पोलीस ठाण्यात चौकशीकामी बोलावून त्याबाबीची खातरजमा केली. त्यानंतर तपासी अंमलदार पोनि घाडगे व तपास पथक, दोन पंच आरोपीत तुकाराम सुपे जावई व मुलगी यांना सोबत घेवून सरकारी वाहनाने ते राहावयास असलेल्या चोली, आळंदी या ठिकाणी जावून तेथे पाहणी केली असता ९७,०००/- एवढे रुपये मिळाले.

४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आढळले

परंतू माहिती प्रमाणे त्या दोन्ही बॅगा न मिळाल्याने त्यांची मुलगी व जावयाकडे कसून चौकशी केली असता नितीन पाटीलचा मित्र विपीन याचे वाघोली येथील बद फ्लॅट मध्ये (वाघोली, गॅपल हॉटेल जवळील औरा-कॉन्टी हौ. सोसा. येथील बी बिल्डींग मधील फ्लॅट नं. १०१) ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याठिकाणी जावून त्या फ्लॅट ची झडती घेतली असता फ्लॅटमध्ये त्या दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस मिळाल्याने त्या ताब्यात घेवून दोन पंचासमक्ष त्या बॅगा खोलून त्यामधील पैशांची मोजदाद केली. त्यामध्ये रोख रक्कम १.५८,३५,०१०/- इतकी रक्कम असल्याचे आढळले. तसेच त्या बॅगांसोबत आढळलेल्या सुटकेस व एका बॅग मधील प्लास्टीकच्या पिशवीमध्ये दागिण्यांच्या डब्या आढळल्या. त्यात एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आढळले असून प्रत्येक प्रकारामध्ये एक किंवा अनेक नग आहेत. त्याशिवाय सायबर पोलीस ठाण्याकडील आरोग्य विभाग संबंधाने दाखल गु.र.नं. ५३ / २०२१, भा.दं.वि. कलम ४०६,४२०, ४०९, १२० ब ३४ सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारीत) कलम ३५६. ८ मधील अधिक तपासादरम्यान इसम नामे संजय शाहूराव सानप (वय ४० वर्षे, रा. वडझरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली असून आज रोजी न्यायालयात पोलीस कोठडी साठी हजर करीत आहोत.

हे अधिकारी करत आहे तपास

सदर गुन्हयाचा तपास अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे विजय पळसुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे व.पो.नि. डी. एस. हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोनि कुमार घाडगे हे करीत आहेत. या गुन्हयातील ही कामगिरी सायबर पोलीस ठाण्यातील पोनि कुमार घाडगे, पोउनि डफळ, पडवळ, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, नितिन चांदणे, कोमल भोसले, सौरभ घाटे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ५६ कोरोनाबाधित, ५४ झाले बरे !

January 12, 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन

March 30, 2021

देशातील सध्याच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार : शिवसेना

September 18, 2020

बकऱ्या चारायला गेलेल्या शेतमजूर तरुणीवर वाघाचा हल्ला !

September 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group