पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील पिलखेड येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
जळगाव ग्रामीण मतदार संघात सुरु असलेली विकास कामांनी प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज पिलखेड येथील अमोल साळुंखे, ईश्वर भालेराव, दिलीप भिल, सुधीर साळुंखे, महेंद्र सोनवणे, लोटन साळुंखे, समाधान साळुंखे, अशोक बागले यांच्यासह अनेक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गावातील विकास कामांसंदर्भात देखील ना. पाटील यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, या प्रवेशामुळे आपण पुन्हा एकदा गुलाबभाऊंसोबत जुळलो असून आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
















