धरणगाव (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी यांनी आज मोठा निर्णय घेत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा प्रवेश केला.
यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी अॅड. शरद माळी यांना शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश देत त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास पी.एम. पाटील सर, शिवसेना शहर प्रमुख विलासभाऊ महाजन, वाल्मीक पाटील, मच्छिंद्र पाटील, पवन महाजन, बाळासाहेब जाधव, भरत माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅड. शरद माळी यांच्या प्रवेशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, युवानेते प्रतापराव पाटील यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पक्ष बळकटीसाठी त्यांच्या योगदानाबद्दल अपेक्षा व्यक्त केली.