धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी दाखल दावा प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी ग्राह्य धरत फेरफार नोंद रद्द केली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी आधीच तत्कालीन नायब तहसिलदार जयंत भट यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रांतधिकारी यांच्याकडे लेखी युक्तिवादात म्हटले तक्रारदार देविदास रामदास रडे (रा.नांदेड) यांच्यातर्फे तोंडी व लेखी युक्तिवादात अॅड. वसंतराव भोलाणे यांनी म्हटले की, रडे यांची नांदेड शिवारातील शेत गट नं. ११५५, याचे क्षेत्र २ हे. १२ आर, +पोट खराब क्षेत्र ० हेक्टर १०० आर, एकुन क्षेत्र ०२ हेक्टर १२ आर, आकार १७ रुपये ४४ पैसे अॅपेलंट व सामील प्रतिवादी नं. २ ते १२ यांचे मालकिची व कब्जे उपभोगातील आहे. नमुद मिळकत ही खुशाल बापू रडे (रा. नांदेड ता. धरणगाव) यांच्या नावे सदरची मिळकत ही दिनांक ०९/०४/१९६६ रोजी मयत झाले तोपर्यत मालक, कब्जेदार व कसत होते. त्यानंतर त्याचा मुलगा नामे रामदास खुशाल रडे हे दिनांक ०७/१२/१९८७ मयत झाले. मयत खुशाल बापु रडे यांचे पश्चात त्यांचे वारस हे आजपर्यंत मिळकत कसत होते व आहे. परंतू बेकायदेशीरपणे फेरफार नोंद क्रमांक १०१६० मंडळ अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्राची पाहणी न करता बेकायदेशिररित्या आपल्या अधिकाराचे गैरवापर करुन मंडळ अधिकारी यांनी शपथपत्र व नगराध्यक्ष धरणगाव यांनी दिलेल्या पत्रावरुन बोगस कागदपत्रे तयार मंजूर केली होती. याविरोधात प्रांतधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, तत्कालीन नायब तहसीलदार सातपुते यांनी चौकशी याबाबत चौकशी केली असता सदर नोंद कोर्टाच्या वारस दाखल्यावर होणे अपेक्षित असतांना तलाठी यांनी सदर नोंद नगराध्यक्ष धरणगाव यांच्या वारस चौकशी अहवालावरुन घेतल्याचे व तत्कालीन मंडळ अधिकारी साळवा यांनी सदर नोंद मंजुर केल्यांचे कागदपत्रांचे अवलोकन केल्यावरुन दिसून आले होते. जे कि पूर्णतः नियमबाहय होते. फेरफार नोंद क्रमांक १०९६० हि नियमबाहय वारस नोंदीचे कामकाज करुन अपिलदार व शासनाची फसवणुक केल्यांचे लक्षात आले म्हणून तत्कालीन धरणगाव तहसिलदार यांनी संदभीय पत्रानुसार फिर्यादी नायब तहसिलदार धरणगाव जयंत पुंडलिक भट यांनी फिर्यादी होवुन भा.द.वि कलम ४२० प्रमाणे धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. ज्यात भारतसिंग देविसिंग परदेशी, निलेश सुरेश चौधरी, वनराज असा बुधा पाटील, कु. रोशनी मोरे व दत्तात्रय आधार चौधरी असे एकूण ५ आरोपी करण्यात आले होते. दरम्यान, प्रांतधिकारी अधिकारी यांनी दोघं बाजू समजून घेतल्यानंतर निकाल दिला असून त्यानुसार अपील अर्ज निष्कर्षात नमूद कारणास्तव मंजूर केला. तसेच मौजे नांदेड ता. धरणगाव येथील फेरफार नोंद क्र. 10160 रद्द करण्यात केली आहे. दरम्यान, अपील करते देविदास रामदास रडे यांच्यातर्फे ॲड. वसंतराव भोलाणे (धरणगाव) यांनी काम पाहिले.
प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले होते. त्यासाठी सर्व कागदपत्रे पुरावे म्हणून युक्ती बाबतचा सोबत दिले. त्यानुसार लेखी व तोंडी युक्तिवाद करत कागदपत्रांचे पुरावे सादर केले होते. त्यानुसार प्रांतधिकारी यांनी आमचे म्हणणे पुराव्याच्या आधारावर ग्राह्य निकाल दिला आहे.
– अॅड. वसंतराव भोलाणे