TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील महिलांचे कर्तृत्त्व मोठे ; अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात कवयित्री बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक कर्तृत्त्ववान महिला घडल्या. जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या चेअरमन शैलजादेवी दिलीपराव निकम यांचेही राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. अशा नारीशक्तीचा सन्मान करणे, हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.

राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे शैलजादेवी निकम यांना नारीरत्न पुरस्कार २०२०-२१ चे वितरण महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दुपारी व.वा.वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात झाला. याप्रसंगी अरुणभाई गुजराथी बोलत होते. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सत्कारमूर्ती शैलजादेवी निकम, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होत्या.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

निकम यांचे कार्य प्रेरणादायी

प्रत्येक क्षेत्रात महिला आज यशस्वीरित्या काम करीत आहेत. महिलांना कमी समजण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तिला आव्हान देऊन अडचणीत आणणारे तोंडघशीच पडले आहेत. शैलजादेवी निकम यांनी केलेले कार्य सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अशा महिलांच्या कार्यापासून इतर महिलांना मोठे काम करण्याची उर्जा मिळते, असे मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले. चोपडा तालुक्यासह इतर भागातील विकास आणि विविध क्षेत्रात निकम परिवाराची उल्लेखनीय कामगिरी आहे. बॅरिस्टर निकम यांच्यापासून चालत आलेल्या या सेवाभावी कार्याचा वारसा या परिवाराची आजची पिढीही जोपासत आहे. याबाबत अभिमान वाटत असल्याचे चंद्रहास गुजराथी यांनी सांगितले. तसेच प्रा.डॉ.शालिनी सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, जगन पाटील, मीनाक्षी चव्हाण, जिल्हा मार्केटींग सोसायटीचे संचालक रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

महिलांना सहकार क्षेत्रात मोठी संधी

अनेक क्षेत्रात काम करीत असताना मिळालेल्या अनेक संधीचे सोने केले. मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेऊनही माचल्यासाऱख्या छोट्या गावात अनेक वर्ष संसार केला. कुटुंबाने शेतीशी निष्ठा राखून ग्रामविकासाला हातभार लावला. महिलांना सहकार क्षेत्रात मोठी संधी आहे. या पुरस्कार व सत्कारामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत सत्कारमूर्ती शैलजादेवी निकम यांनी व्यक्त केले.

विविध संस्थातर्फे सन्मान

निकम यांच्या विविध क्षेत्रातील योगदानानिमित्त त्यांचा सत्कार माचलेसह अनेक ठिकाणच्या विविध सेवाभावी संस्था, संघटना, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त वाल्मीक पाटील, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी त्वचारोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल लोलगे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संदिपा वाघ, सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावला अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना महापौरांकडून अभिवादन

April 30, 2021

Could Red Dog Be Just The Right Casino For You, Even Without Live Games?

November 20, 2022

वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाईंचे निधन !

October 24, 2023

जळगाव : गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार !

July 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group