जळगाव (प्रतिनिधी) सोन्यामध्ये गुंतवणुक करुन त्यातून अधिकचा नफा मिळविण्याचे अमिष दाखवित अर्थना प्रभाकर पाटील या महिला पोलीसाने तिच्या दोन साहकाऱ्यांना ३० लाखात गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला, अशाच पद्धतीने अर्चना पाटील हीने ललिता दीपक वेशे (वय ४०, रा. चौघुले प्लॉट) या महिलेला ४ लाखांचा चुना लावल्याचे उघड झाले. त्या महिलेने शनिवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित अर्चना पाटील हिच्याविरुद्ध दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चौघुले प्लॉटमधील ललिता वेशे या खासगी नोकरी करुन उदनिर्वाह करतात. फ्रेबुवारी २०२४ मध्ये त्या शहरातील एका व्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे तत्कालीन एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली अर्चना रविंद्र पाटील यांच्योबत ओळख झाली. त्या महिला पोलीसाने मी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या मैत्री झाली. त्यानंतर त्या दोधी व्हॉट्सअॅप कॉलवर एकमेकांच्या संपर्कात होत्या. दि. १ एप्रिल २०२४ रोजी अर्चना पाटील यांनी ललिता येशे यांना भेटण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी तीने चांगली बेनीफिट मिळणारी योजना आहे, सध्या सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोनार व्यावसायीक असलेले माणिक जोहरी, जितूनी, मयूर वाणी, महावीर ज्वेलर्स अशांचा ग्रुप आहे. आम्ही सर्वजण दुबईवरुन सोने कमी भावात आणून ते इथे सोनारांना जास्त भावात विकतो असे सांगितले. यापुर्वी अनेकांना गुंतवणूकीतून पैसे कमवून दिले, तू माझी चांगली असून या स्किममध्ये चार लाख रुपये टाक, सहा महिन्यात तुला डबल करुन देईल. त्यामुळे तूारी परिस्थिती सुधरुन जाईल असे अमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून ललिता येशे यांनी दि. १५ एप्रिल रोजी ४ लाख रुपयांची रोकड अर्चना पाटील यांच्याकडे दिली.
त्या महिला पोलिसाविरुद्ध दुसरा गुन्हा
आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर ललिता येशे या घाबरून गेल्या होत्या. परंतु शुक्रवारी दोन महिला पोलिसांनी अर्चना पाटील हीने फसवणुक केल्याची चातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर ललिता येशे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील यांच्याविरुद्ध दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेक दिला पण विड्रॉल करण्यास मनाई
सहा महिन्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात ललिता येशे यांनी अर्चना पाटील यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यांनी तगादा लावल्यामुळे अर्चना पाटील हीने चार लाख रुपयांचा नफा म्हणून बैंक ऑफ महाराष्ट्र जिल्हापेठ शाखेचा धनादेश दिला. परंतू हा धनादेश मी सांगेल तेव्हा विड्रॉलसाठी टाक असेही तीने सांगितले होते. मात्र त्यानंतर देखील येशे या अर्चना पाटील यांच्याकडे पैशांची मागणी करीत होत्या.
पैसे मागितले तर मारुन टाकण्याची दिली धमकी
२२ जानेवारी रोजी येशे यांनी अर्चना पाटील यांना भेटण्यासाठी बोलावले असता, भेटून तीने तुझे पैसे बुडाले व आता जर तू मला परत पैसे मागितले तर तुला मारुन टाकेल, मी पोलीस असून मला कायदा चांगल्याप्रकारे माहिती आहे तू माझे काहीच करु शकत नाही. उलटून मी तुला कुठल्याही केसमध्ये अडकवेल अशी धमकी दिली होती.
बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ
फसवणुक करणाऱ्या अर्चना पाटील नामक महिला पोलिसाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना कोट्यावधी रुपयात गंडविले आहे. परंतु अनेकांकडे पुरावे नसल्याने तर काही जण समाजात बदनामी होईल या भीतीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहे. या महिला पोलीसाने राजकीय पुढाऱ्यांना देखील गंडा घातल्याची चर्चा आता सुरु झाली असून पुढील काही दिवसात अनेक गुन्हे दाखल होण्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे.
महिला पोलिसाला पाच दिवसांची कोठडी
दोन महिला पोलिसांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित अर्चना प्रभाकर पाटील (रा. आशाबाबानगर) या महिलेला शहर पोलिसांनी अटक केली. तीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.