पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) झोपाळा खेळताना आठ वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओढणीच्या सहाय्याने झोपाळा खेळत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना पिंपरी चिंचवडमधील आहे. आपल्या मुलींना घरात खेळण्यासाठी सोडून शेख दाम्पत्य हे घराबाहेर गेले. त्यावेळी घरातील मुली सुद्धा खेळण्यात मग्न झाल्या. आपल्या सर्वात लहान असलेल्या मुलीला खेळवण्यासाठी मोठ्या बहिणींनी ओढणीचा झोपाळा बनवला. या ओढणीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या झोपाळ्यावर ८ वर्षीय चिमुकली खेळत होते. मात्र, त्याच दरम्यान, झोपाळ्यावरुन तिचा पाय सरकरला आणि अचानक तिला गळफास बसला. या घटनेत ८ वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून मृत्यू झाला आहे. चिमुकल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल कऱण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे अधोरखित झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लहान मुले शाळा नसल्याने घरातच आहेत. घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन मिळेल तिथे खेळत बसतात. शक्यतो पालक आपापल्या कामात असतात अशा वेळी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.