धरणगाव (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील दभाशी येथील तापी नदी पात्रात मंगळवारी सकाळी राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली. या घटनेतील राजेंद्र पाटील, मुलगी ज्ञानल पाटील यांचे मृतदेह कालच आढळून आले होते. तर आज पत्नी वंदनाबाई पाटील यांचा मृतदेह सावळदे गावानजीक तापीच्या पात्रात आढळून आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-४८), मुलगी म्यॉनल राजेंद्र पाटील (वय-२१) हे तिघ जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी- १०९४) गाडीने दि. १७ रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे उत्तराकार्याचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी ६ वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. दि. १८ दुपारी ४ वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. तर मुलगा आणि सुन भोद येथेच होते. तर राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध घेतला जात होता. मात्र आज दि. १९ पहाटे १० वाजता सावळदे गावानजीक तापीच्या पात्रात वंदनाबाई यांचा मृतदेह आढळून आला. तिघांचे शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात सुरू आहे.