लातूर (वृत्तसंस्था) चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या टिप्परने मोटारसायकला ३ जुलै रोजी दुपारी जोराची धडक दिली. त्यात अंबुलगा येथील गंभीर अवस्थेतील बहिण व भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. अवधुत शिवराज रकटाटे (वय १९) व निकीता शिवराज रकटाटे (वय २३) असे मयत भाऊ-बहिणीचे नाव आहे.
चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील निकिता रक्ताटे ही लातुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. निकिता व तिचा भाऊ अवधूत रक्ताटे याचा लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यात आला. ही प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास हे बहीण भाऊ दुचाकी (एमएच २४ बीडी ३२२७) वरून गावाकडे परतत होते.
त्याचवेळी आष्टामोड येथील अरुंद रस्त्यावर आले असता समोरुन येणाऱ्या (एम.एच.२० ई एल ७२०४) या टिप्परने जोराची धडक दिल्याने दोन्ही भावंडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झालेत. आई – वडीलांचा आधार गेल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. शोकाकुल वातावरणात अंबुलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तर याबाबत चाकूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोघांच्या मृत्यूंची बातमी गावात समजताच परिसरात मोठी शोककळा पसरली. तसेच कुटूंबाने एकच आक्रोश केला.