धरणगाव (प्रतिनिधी) बोकडला ठोस मारल्याच्या संशयातून कार चालकाला बेदम मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली. एवढेच नव्हे तर चालकाच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोतही लांबवल्याची घटना पारोळा नाक्याजवळ रविवारी सायंकाळी घडली.
या संदर्भात प्रशांत समाधान नेरकर (वय : २६ वर्ष, व्यवसाय मार्केटींग रा. रोटवद ता धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नेकर यांनी म्हटले आहे की, दि.२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते परिवारसह धरणगाव-चोपडा रोडने घरी जात असतांना सांयकाळी ५:३० वाजेच्या सुंरास पारोळा नाक्याजवळ त्यांची कार (क्र mh-१९-eg-२०१७) समोर डावीकडून एक बोकड्या आला. त्यामुळे नेरकर यांनी कार थांबली. तेव्हा रस्त्याचे डाव्या बाजुस उभे असलेल्या चार अज्ञात लोकं गाडी जवळ धावत आले व मी बोकड्याला ठोस मारली असे समजून त्यांनी गाडीचे काच फोडुन गाडीची डिक्की दाबुन सुमारे १५ हजाराचे नुकसान केले.
तसेच नेरकर यांना नाकावर, तोंडावर तसेच इतर ठिकाणी प्लॉस्टीकचा पाईप व काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन व जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, त्यांच्या आईच्या अंगावर धावून जावुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच त्यांच्या गळ्यातील अंदाजे ८ ग्रॅम सोन्याचे पॅडल असलेली पोत चौघां संशयित आरोपीपैकी एकाने जबरीने ओढुन नेली. याप्रकरणी चार अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि संतोष पवार हे करीत आहेत.