चोपडा (प्रतिनिधी) ‘चल बाबू बाय!’ असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत खासगी रुग्णवाहिकेवरील चालकाने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे शवविच्छेदन करणाऱ्याला मित्राला त्याने मंगळवारी दुपारी भेटून “उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे; पण जरा सांभाळून कर… डोकं जास्त फाडू नको… असेही सांगितले होते. गिरीश झुलाल पाटील (वय २७, रा. रंगराव आबा नगर, चोपडा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
गिरीश हा गेल्या अनेक वर्षांपासून खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत होता. त्याचा चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वांशी चांगली ओळख होती. तसेच शवविच्छेदन करणारा मामू ऊर्फ प्रशांत पाटील (४०) यांच्याशीही चांगली मैत्री होती. गिरीशने मंगळवारी दुपारी मामूची भेट घेत ‘उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे; जरा सांभाळून कर. पण डोकं जास्त फाडू नको’ असेही सांगितले. यानंतर बुधवारी सकाळी गिरीश याने आत्महत्या केल्याचा निरोप आला आणि सर्वच जण सुन्न झाले. गिरीश हा परिवारातील एकुलता मुलगा होता. त्याने घरातील जिन्याच्या लोखंडी बीमला दोरी बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. गिरीश हा हा अनेक वर्षापासून रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत करत होता. दरम्यान, गिरीशने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. गिरीश हा एकुलता एका मुलगा असल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला होता.
















