TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उघडले न्यायालय ; गोवंश प्रेमी नागरिकाला दिलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पोलिसांनी जप्त केलेली गुरं गोशाळेतच राहू देण्यात यावी, या मागणीसाठी एका गोवंश प्रेमी नागरिकाने शनिवारी रात्री थेट धरणगाव न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विशेष म्हणजे या बाबतच्या सुनवाईसाठी धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री साडेदहा वाजेला न्यायालय उघडले. सुनवाईनंतर न्यायालयाने गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. त्यामुळे आता पुढील आदेश होईपर्यंत पोलिसांना गुरं गोशाळेतच राहू द्यावी लागणार आहेत. दरम्यान, धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय उघडल्यामुळे आज सगळीकडे याचीच चर्चा होती.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरात व पाळधी दूरक्षेत्र भागात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी ३४ गुरे मिळून आली होती. त्यापैकी २० गुरे धरणगाव शहरात कुरेशी मोहल्ला भागात व १४ गुरे पारधी दूरक्षेत्र हद्दीत आढळून आली होती. सदर गुरांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गोशाळेत टाकण्यात आले होते. परंतू थोड्या दिवसांनी यात राजकीय दबाव सुरु झाला. अगदी गोशाळेला याबाबत एक पत्र देत ही गुरं मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे यांनी याबाबत धरणगाव न्यायालयात अॅड.राहुल पारेख यांच्यामार्फत एक याचिका दाखल केली.

 

श्रीपाद पांडे यांनी याचिकेत गुरांना गोशाळेतच राहू देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. यानंतर अॅड.राहुल पारेख रात्री दहा वाजेला न्यायालयात गेले आणि त्यांनी न्यायालयाला पटवून दिले की, जर तात्काळ सुनवाई न झाल्यास प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. न्या. एस.डी. सावरकर यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, सुनवाई घेऊन गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिलेत. त्यामुळे आता पुढील आदेश होईपर्यंत पोलिसांना गुरे गोशाळेतच राहू द्यावी लागणार आहेत. याबाबत पुढील सुनवाई आता २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अॅड.राहुल पारेख यांच्या समोर पुन्हा एक समस्या उभी राहिली की, न्यायालयाने आदेश तर दिले आहेत. परंतू आदेशाची प्रत नसल्यामुळे पोलीस प्रशासन पुढील कारवाई करून मोकळे होण्याची भीती आहे. त्यावर अॅड.पारेख यांना स्व:तच एक अर्ज लिहून त्यावर न्यायालयालाने या संबंधी कोणते आदेश दिलेत?, हे नमूद करण्याचे ठरवले. त्यानुसार अॅड.पारेख यांनी तारीख आणि वेळ नमूद करत सेल्फ अटेस्टेड अर्ज तक्रारदार श्री. पांडे यांच्यामार्फत पोलिसांसमोर रात्री अकरा वाजेलाच ठेवला. परंतू रात्री पोलीस स्थानकात यावर मार्ग निघू शकला नाही. शेवटी रविवारी सकाळी ११ वाजेला श्री. पांडे आणि गावातील गोवंश प्रेमी नागरिकांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली.

 

विशेष म्हणजे गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे हे रात्रीपासून तर पहाटेपर्यंत पोलीस स्थानकातच थांबून होते. दरम्यान, धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय उघडल्यामुळे सगळीकडे याचीच जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरीकडे याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व पकडण्यात आलेले २० गुरं कायमस्वरूपी संगोपनासाठी कामधेनू गो शाळेत ठेवावे, असे निवेदन नुकतेच भाजपाने धरणगाव पोलीसांना दिले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2026 !

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

तरूछाया वृक्षारोपण प्रकल्पात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इराणमध्ये हमास प्रमुख इस्माईल हनियाची हत्या !

August 1, 2024

छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची थेट न्यायालयात धाव

September 24, 2021

शिरसोली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

January 28, 2022

रुग्णाच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी डॉ. सुनिल गाजरे यांची चौकशी व्हावी ; नातेवाईकांची मागणी !

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group