जळगाव (प्रतिनिधी) शेतात वडीलांना फवारणीसाठी मदतीला गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. विशेष म्हणजे सकाळीच या तरुणाने शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात काॅमर्सच्या द्वितीय वर्षाचा प्रवेश निश्चित केला.
ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय २०, रा. कुवारखेडा, ता. जळगाव) असे मृताचे नाव अाहे. या घटनेनंतर अरुण लक्ष्मण पाटील, महेश आनंदा पाटील, प्रभाकर मुकुंदराव पाटील, रवींद्र पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, या घटनेमुळे पाटील परिवाराला माेठा धक्का बसला अाहे. गावात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.