TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते आज बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णवाहिका चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची मागणी मान्य करून त्यांना दिलासा दिला.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ तर आज 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि रूग्णवाहिका चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले. या रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे – पाटील, आतिष सोनवणे, यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

रूग्णवाहिका चालकांना पालकमंत्र्यांचा दिलासा

या लोकार्पण कार्यक्रमात रूग्णवाहिका चालकांनी आपली समस्या पालकमंत्री श्री. पाटील यांचेकडे मांडली. ज्यात आजवर रूग्णवाहिका चालकांना वेतन हे प्रति किलोमीटरच्या दराने प्रदान करण्यात येत होते. मात्र त्यांना फेरीनुसार वेतन मिळावे अशी मागणी चालकांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती जाणून घेतली व त्यांची समस्या सोडविली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे रास्तारोको आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाणा, पोलीसांची छापेमारी ; पाच महिलांसह सहा पुरुष ताब्यात !

September 13, 2023

‘न्यूज अरेना’ संस्थेचा सर्वे आला समोर ; जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदार संघात कोण मारणार बाजी !

June 21, 2023

घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा !

April 25, 2022

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group