धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चमगाव येथील 2025 ते 2030 पर्यंतच्या विकास सेवा सोसायटीच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या विकासासाठी आणि संस्थेच्या आर्थिक नुकसान व निवडणूक खर्च टाळण्यासाठी गावातील राजकीय व सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली.
नवनिर्वाचित संचालक मंडळ:
सर्व साधारण मतदारसंघ:
1) पाटील वसंतराव गहिंदल
2) पाटील अनिल संतोष
3) पाटील पंजाबराव रामराव
4) पाटील विलास मोतीराम
5) पाटील तुषार भगवान
6) पाटील भगवान दलपत
7) पाटील पंढरीनाथ धर्मा
8) पाटील भुषण अशोक
इतर मागासवर्ग:
1) पाटील सागर रंगराव
महिला राखीव:
1) पाटील रेखाबाई ईश्वर
2) पाटील रेखाबाई मोतीलाल
अनुसूचित जाती जमाती:
1) सावंत कैलास बिसन
निवडणूक प्रक्रियेत गावातील सर्व नागरिक, पदाधिकारी, आणि सभासदांनी सहकार्य केल्यामुळे या निवडणुकीला यश मिळाले. निवडणुकीच्या माध्यमातून संस्थेच्या आर्थिक नुकसानाचा अंदाज घेतला गेला आणि सामाजिक तसेच राजकीय एकोपा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावरून संस्था आणि गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.
नवीन संचालक मंडळाने सर्व सभासदांचे तसेच निवडणुकीत सहकार्य करणार्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केले. त्यांनी आश्वासन दिले की, आगामी काळात संस्था आणि गावाच्या विकासासाठी कटीबद्ध राहतील आणि सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा विकास साधला जाईल. निवडणुकीच्या यशस्वी पार पडण्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करण्यात आले.