TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2021
in क्रीडा, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, याकरीता जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदिप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा आदि उपस्थित होते.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारणीचा मसुदा नव्याने तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील ११ तालुक्यांच्या अपूर्ण क्रीडा संकुल बांधकामासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्तावही तयार करण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधांबरोबरच चांगले मार्गदर्शक (कोच) उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खेळाच्या सुविधा वापराचे दर माफक असावे अशी सुचनाही केली. जळगाव जिल्हा कुस्तीसाठी प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीसारखे खेळाडू आहेत. जिल्ह्यात अजून चांगले कुस्तीगीर निर्माण होण्यासाठी कुस्तीसाठी कोच मिळण्यासाठी क्रीडा आयुक्तांकडे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. ग्रामीण भागातही चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता निधीच्या उपलब्धतेनुसार खुल्या व्यायामशाळांना मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचे अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असून जिल्हयात क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा संकुलातील जुन्या गाळ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती

जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जणांची उपसमिती नेमण्यात यावी असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुचनाही त्यांनी बैठकीत दिली.

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बांधकामाचा, तेथील साहित्य, खेळाडूच्या सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांचे मानधन, संकुलातील गाळ्यामधील भागीदारीचे नांव रेकॉर्डवरुन कमी करणे, गाळे हस्तांतरण मान्यता, संकुलातील दुरुस्ती व सुविधा, महापालिकेच्या थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर आदि विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

भुसावळच्या डॉ. नि. तु. पाटील यांच्या लढ्याला आता केंद्राचीही साथ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रवाशांची वाट पहात उभे असलेल्या रिक्षा चालकाला धोपटण्याने मारहाण

January 6, 2026

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

January 1, 2021

खडका येथील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन

November 6, 2020

स्टिंग ऑपरेशन : आमदार खरेदी करण्यासाठी भाजपाकडून १० कोटी !

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group