TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साधू बनला सैतान ! जबरदस्तीनं दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; साधू फरार, शिष्याला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

रीवा (वृत्तसंस्था) एका साधूने दारू पिऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधू सध्या फरार झाला असून त्याच्या शिष्याला अटक करण्यात आली आहे. एका किशोरवयीन मुलीनं या साधूवर जबरदस्तीनं दारू पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

महंत सीताराम दास असंया हाय प्रोफाईल साधूचं नाव असून तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सर्किट हाऊसमध्ये राहात होता. इथंच ही घटना घडल्याचं समोर आलंय. या महंताचा अनेक पॉश भागांतील उच्चभ्रू लोकांमध्ये वावर आहे. अतिरिक्त एसपी शिवकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम बाबा उर्फ ​​समर्थ त्रिपाठी यानं रीवामधील सर्वात पॉश क्षेत्र असलेल्या सर्किट हाऊसमध्ये त्याच्या साथीदारांच्या मदतीनं हा कारनामा केला. आरोपी बाबाचा शिष्य विनोद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेपासून बाबा फरार आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हनुमान कथा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आरोपी रीवा इथं आले होते.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

1 एप्रिलपासून सिरमौर चौकाचौकात संकटमोचन हनुमान कथा होणार आहे. या कथेत श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांच्यासह महंत सीताराम दास महाराज यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, कथेला सुरुवात होण्यापूर्वीच वेदांती महाराजांच्या शिष्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी 16 वर्षीय पीडित तरुणीनं सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी सतना येथील रहिवासी आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

रीवा पोलिसात दाखल तक्रारीनुसार, विनोद पांडे यांच्या बोलावण्यावरून पीडित किशोरी सतना येथून रीवा इथं आली होती. विनोद पांडे हा शिक्षा झालेला जुना गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत. सोमवारी रात्री विनोदचे दोन साथीदार या किशोरीला आपल्यासोबत सर्किट हाऊसमध्ये घेऊन गेले. इथं तिची विनोद याच्याशी गाठ पडली. यानंतर तो तिला सर्किट हाऊसच्या चार क्रमांकाच्या खोलीत घेऊन गेला. इथं तो महंत आणि त्याचा एक शिष्य धीरेंद्र आला आणि सगळ्यांनी मिळून दारू प्यायली. त्यांनी या मुलीलाही दारू पाजण्याचा प्रयत्न केला. मुलीनं नकार दिल्यावर तिला जबरदस्तीनं दारू पाजली. दारू पिऊन झाल्यावर महंत आणि मुलगी सोडून सगळे बाहेर गेले आणि त्यांनी बाहेरून दरवाजा बंद केला. यानंतर महंतानं किशोरीवर बलात्कार केला.

बडे नेते, उद्योगपती, बिल्डर यांच्याशी संबंध

जिल्ह्यातील बडे नेते, उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकही या महंताच्या निकटवर्तीयांमध्ये असल्याचं बोललं जातं. सीताराम दास जेव्हा रीवा इथं यायचा, तेव्हा त्याला भेटण्यासाठी या लोकांची रांग लागलेली असायची. यावेळीही तो एका बिल्डरनं फोन करून बोलावल्यावरूनच रीवा इथं आला होता. समदिया बिल्डर्सच्या ज्या कार्यक्रमासाठी तो आला होता, त्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रंही छापण्यात आली होती.

आरोपी महंत फरार

रीवा येथील समदडिया मॉलच्या उद्घाटनप्रसंगी आरोपीचे गुरू आणि श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांची कथा होणार आहे. 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत हनुमान कथा व अष्टोत्तर शत रुद्राभिषेकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याच्या तयारीसाठी वेदांती महाराजांचा आरोपी शिष्य सीताराम दास रीवा इथं आला होता. तो या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भेटला होता. आता तो फरार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल गुढीपाडव्याचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगावात बंदुकीच्या धाकावर पंधरा लाख रुपये लुटले !

March 1, 2021

पत्रकार शेख सत्तार यांचे अल्पशा आजाराने निधन

October 24, 2020

तुला ब्रा घालायला आवडत नाही का? ; मलायका अरोरा झाली ट्रोल

January 22, 2022

चाळीसगाव हादरलं ! पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group