धरणगाव (प्रतिनिधी) नुकतेच धरणगाव पंचायत समिती या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प जळगाव, यांच्या वतीने एक दिवसीय शिशु पोषण प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी धरणगाव, पारोळा, एरंडोल, पर्यवेक्षिका, व अंगणवाडी सेविका, या सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले या कार्यक्रमाला प्रास्ताविकात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव विजयसिंग परदेशी यांनी बाळाच्या जीवनातील पहिले एकहजार दिवस हे बाळाच्या वाढ व विकासासाठी महत्त्वाचे असतात यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. असे याप्रसंगी नमूद केले.
पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांची शिशु पोषणाबाबत क्षमतावृद्धी करण्यात आली. अंगणवाडी सेविका यांनी कौशल्य गृहभेटी करून सर्व स्तनदा माता व गरोदर माता ० ते ०६वर्षे बालक, किशोरी मुले व मुली, बालविवाह, बाबतीत जनजागृती करावी. याप्रसंगी युनिसेफ राज्य सल्लागार शिशु पोषणपि. डी सुदामे यांनी याप्रसंगी अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिले. यात गरोदर पणात किमान ०४ वेळेस आहार घ्यावा आहारात सर्व प्रकारचे अन्नघटक असावेत व कुटुंबातून मातेला मदत व सहकार्य मिळणे आवश्यक असते. या बाबतीत माहिती दिली. बाळ जन्मा नंतर एका तासाच्या आत स्तनपानात आईचे दूध आवश्यक असते. पहिले ६ महिने आईचे दूध महत्त्वाचे असते.
याप्रसंगी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी आपला प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. यावेळी प्रतिभा पाटील एरंडोल, ज्योती पाटील पारोळा, वंदना कंखरे, नंदिनी पाटील, धरणगाव यांनी मनोगत व्यक्त केले. हिरकणी पाटील, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी पी डी सुदामे यांचा सत्कार बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका प्रविणा तडवी यांनी नियोजन करून परिश्रम घेतले.