TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच वेळी निघाली वृद्ध दाम्पत्याची अंत्ययात्रा ; बातमी वाचून तुमचेही डोळे पाणावतील !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील लोहटार येथील एका वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन केल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. मयत वृद्ध दाम्पत्यांची तालुक्यातिल लोहटार येथून एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आल्यानंतर समाजमन सुन्न झाले आहे.

लोहटार ता. पाचोरा येथील एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय ७८) यांना सुरुवाती पासूनच अध्यात्माची आवड होती. महामंडळातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (वय ७२) हे नियमित देवपूजा करुन अध्यात्मिक मार्गावर जीवन जगत होते. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. त्यानंतर सर्व झोपले. यानंतर ईश्वर पाटील यांनी ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास स्टेशनला फोन करून मी व माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणासही कारणीभूत धरु नये, असे सांगितले. यानंतर पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले. परंतू तोपर्यंत ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध केलेले होते.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

वृद्ध दाम्पत्याला तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर देखील वृद्ध दाम्पत्यास वाचविण्यास यश आले नाही. उपचार सुरू असतांना १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्राणज्योत मालवली. तर सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी देखील जगाचा निरोप घेतला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत. दोघांवर अतिशय शोकाकुल वातावरणात दांम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची सापडली चिठ्ठी !
आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची सापडली चिठ्ठी ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील या दाम्पत्यास दोन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. सर्व काही सुरळीत होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील हे दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे जवळ एक चिठ्ठी आढळून आली असून त्या चिठ्ठीत आम्ही दोघेही जीवनास कंटाळून स्वखुशीने आत्महत् करीत आहेत. आमच्या मृत्युस कोणासही कारणीभूत धरु नये. अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्व काही सुरळीत असताना दांपत्याने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

एकाच वेळी निघाली वृद्ध दाम्पत्याची अंत्ययात्रा !
ईश्वर नामदेव पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील यांनी एकाच वेळी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. एक दिवस वृद्ध दाम्पत्यांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. मात्र १० जुलै रोजी आधी प्रमिलाबाई पाटील व अवघ्या ६ तासांच्या अंतराने ईश्वर पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. अतिशय जड अंतःकरणाने वृद्ध दाम्पत्यांची लोहटार गावातुन एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आल्याने अनेकांची डोळे पाणावले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मित्रांसोबत गेला, पण घरी परत आलाच नाही ; तरुणाचा डोहात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

July 29, 2024

आशादीप वसतीगृह प्रकरण : आणखी इनसायडर स्टोरी : दिलीप तिवारी

March 5, 2021

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 23 ते 29 नोव्हेंबर 2025 !

November 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group