TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे !

कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री ललित गांधी यांचे प्रतिपादन : जळगावात व्यापारी मेळावा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांनी आजवर अनेकवेळा पाठपुरावा केला परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेणार नाही. निवेदने देऊन काहीही होणार नाही. न्यायालयाचे निर्णय आपल्या विरोधात आहे त्यामुळे शासनाच्या मागे लागून कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मार्ग नाही, असे प्रतिपादन व्यापाऱ्यांची शिखर संस्था कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री ललित गांधी यांनी केले.

देशभरात व्यापाऱ्यांच्या काही न काही समस्या असून त्या शासनाकडून मार्गी लावल्या जात नाही. शहरासह राज्यातील अनेक मनपामध्ये मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आपल्याकडे व्यापाऱ्यांमध्ये मोठी उदासीनता आहे. कॅट आणि जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जिंदा, लघु उद्योग भारती संस्था, महाराष्ट्र चेंबर आँफ कोमर्स आयोजित व्यापाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी पांझरापोळ संस्थानमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. व्यापारी मेळाव्याच्या व्यासपीठावर वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगरिया, जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय काबरा, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे लघु उद्योग भारतीचे किशोर ढाके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष संजय दादलीका, कँट चे जिल्हा अध्यक्ष संजय शाह आदी उपस्थित होते.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

ललित गांधी पुढे म्हणाले की, शासनाच्या प्रत्येक कामात आपण योगदान देतो तरीही व्यापाऱ्यांबद्दल हव्या त्या सुधारणा, बदल होत नाही. कोरोना काळात देखील आपण २४ तास सेवा केलेली आहे. कुणीही धजावत नसताना आपण जीवाची पर्वा न करता सेवा दिली. इतके करूनही आपल्या एकही समस्येची दखल घेतली जात नाही. कोरोना काळात अनेक नियम बदलण्यात आले, व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला तरीही त्यांचे कार्य सुरूच होते, असे ते म्हणाले.

जीएसटी पोर्टलमुळे मनस्ताप वाढला

उद्योग क्षेत्रात आपण पुढे आलो पण आज जेवढा वेळ व्यवसाय, व्यापाराला देतो त्यापेक्षा जास्त वेळ जीएसटीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला द्यावा लागतो. जीएसटी कायद्यात आजवर शेकडो सुधारणा करण्यात आल्या परंतु अजूनही तो कायदा सुटसुटीत नाही. जीएसटी पोर्टल एकही दिवस व्यवस्थित चालले नाही. मुळात करप्रणालीतील पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारी आहे. व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, असे मत ललित गांधी यांनी व्यक्त केले.

विमानसेवा सुरळीत केल्यास फायदा होईल

जळगाव विमानतळ कार्यान्वित झाले असले तरी अद्यापही विमानसेवा सुरळीत झालेली नाही. जळगाव विमानसेवेला मुंबई येथे स्लॉट उपलब्ध करून घ्यावे, तसेच जळगाव-पुणे, जळगाव-इंदोर विमानसेवा सुरू करावी यासाठी पाठपुरावा करण्याचा मुद्दा पुरुषोत्तम टावरी यांनी मांडला. तसेच जीएसटीविषयी सविस्तर विवेचन करून कर सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश लोढा यांनी ५० पानी निवेदन ललित गांधी यांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गांधी यांनी तर आभार किशोर ढाके यांनी मानले.

गाळेधारक संघटनेतर्फे निवेदन

जळगावातील सर्व गाळेधारकांच्या समितीतर्फे संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात ललित गांधी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे गाळेधारकांचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत तो प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली.

कॅट जिल्हाध्यक्षपदी संजय शाह

जळगावात आयोजित मेळावा पार पडताना जळगाव जिल्हा कॅटच्या जिल्हाध्यक्षपदी संजय शाह यांची निवड करण्यात आल्याचे ललित गांधी यांनी जाहीर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
Next Post

राम मंदिराच्या नावे भाजपनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही?; काँग्रेसचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे महेंद्र पाटील वि.का. सोसायटीवर बिनविरोध

January 25, 2022

निवडणूकासंदर्भात मनसेची अमळनेर, धरणगाव व जळगाव तालुक्यांची आढावा बैठक !

February 13, 2022

बिलकिस बानो सामूहिक अत्याचार प्रकरणी सर्व दोषींची माफी रद्द करा!

August 17, 2022

शालकाने केला मेव्हण्याचा निर्घृण खून ; समोर आली धक्कादायक माहिती !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group