मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार होती. मात्र पायाभरणीचा हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजी नाट्य सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 16 जणांनाच निमंत्रण देण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याने ते नाराज असल्याचे सांगत होते. मात्र अखेर आनंदराज आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आलं होतं. आज दुपारी साडेतीन वाजता हा पायाभरणी सोहळा पार पडणार होता. या कार्यक्रमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, किशोरी पेडणेकर तसेच स्थानिक आमदार आणि नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात न आल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे आज होणारा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.