नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नुकत्याच वह्या वाटण्यात आल्यात.
नांदेड येथील मराठी मुलांच्या शाळेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे 111 विद्यार्थ्यांना तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 190 विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या. याप्रसंगी दोघं शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षिका हजर होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे युवा सेनेचे उप तालुकाध्यक्ष भरत सैंदाणे, मागासवर्गीय सेना विभाग प्रमुख संजय मोरे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत बर्हांटे, नांदेड युवासेना शाखाध्यक्ष गोकुळ सैंदाणे, शिवसेना शाखा अध्यक्ष ललित पाटील, मागासवर्गीय सेना शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी आणि प्रकाश भोई यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे वह्या मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विद्यार्थांसह पालकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.