नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) कायमस्वरूपी दुर्लक्षीत राहीलेल्या नांदेड ते घुरखेडा रस्त्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या बातमीमुळे नांदेड ग्रामस्थांमध्ये आनंद पसरला आहे.
येथील युवा सेनेचे उप तालुकाध्यक्ष भरत सैंदाणे यांच्यासह महेश रायसिंगे, ज्ञानेश्वर सैंदाणे, गोकुळ सैंदाणे, गणेश चौधरी, राकेश पाटील, हर्षल पिंपळकर, दत्तू कोडी, संजय मोरे, अक्षय बदाने, भटू कोळी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ व शिवसेना (शिंदे गट) युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची भेट घेवून निवेदन सादर केले होते. त्यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आता निधी मंजूर झाल्याने ना . गुलाबराव पाटील यांचे युवा सेनेने अभिनंदन केले आहे.