नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे, हे देशाचं दुर्भाग्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी केलं आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही आहे. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. यानंतर देशभरात वाढती लोकसंख्या पाहता कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे. देशभरात उत्तर प्रदेशच्या नव्या लोकसंख्या धोरणाची चर्चा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी चित्रपट अभिनेता आमिर खानबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची मागणी करतानाच सुधीर गुप्ता म्हणाले, की लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे. हे देशाचं दुर्भाग्य आहे.
सुधीर गुप्ता म्हणाले, की आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाबी. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा? ते पुढे म्हणाले, की जग जे म्हणत होतं, की अंडे विकण्याशिवाय जास्त अक्कल नाही. इतकंच केलं तरी ठीक आहे.
भाजप खासदार पुढे म्हणाले, की हे अत्यंत स्पष्ट आहे, की आपल्याला एक ना एक दिवस याचा विचार करावाच लागणार आहे. मी पाहिलं, की भारताची एक इंचही जमीन वाढली नाही आणि लोकसंख्या १४० कोटीपर्यंत पोहोचली. ही गोष्ट शुभेच्छा देण्याची किंवा अभिनंदन करण्यासारखी नाही. मागे वळून पाहिलं तर दिसतं, की भारताची फाळणी झाली होती, तेव्हा पाकिस्तानकडे जमीन जास्त गेली होती आणि लोकसंख्या कमी, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.