TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे : नरभक्षक बिबट्याने घेतला आतापर्यंत तीन बालकांचा बळी !

दीदी, स्वामीनंतर रमेशचा मृत्यू ; बोरकुंड शिवारातील शेतकऱ्यांसह नागरिक प्रचंड भयभीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरकुंड शिवारात दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला आहे. रमेश नानसिंग डुडवे (वय १०), असे मयत बालकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन बालकांचा बळी घेतला आहे.

झोपेतच उचलून नेले बालकाला !

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मोघण ता. धुळे रमेश शिवारात धुडकु संपत माळी घेवुन यांच्या शेतात जागल्या म्हणुन काम करणारे नानसिंग जल्या डुडवे मूळ (रा. मालवन ता. वरला जि. बडवानी) यांचे कुटुंब दि. २५ रोजी रात्री जेवण आटोपुन शेतातील झोपडीत झोपले होते. दि. २६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घरातील महिला शेती कामासाठी जायचे असल्याने लवकर उठून झोपडीजवळील रिकाम्या जागेत स्वयंपाक करत असतांना रमेश नानसिंग डुडवे (वय १०) हा झोपलेला होता. त्यावेळी समोरुन अचानक बिबट्या पळत आला व त्याने रमेशच्या मानेला पकडत उचलून नेले. त्यामुळे रमेशच्या आईसह इतर नातेवाइकही बिबट्याच्या मागे धाव घेत आरडा-ओरड केली. यामुळे बिबट्या रमेश यास नाल्यात सोडून पळून गेला.

उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू !

बिबट्याच्या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी झाला होता. त्याला आजुबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. रमेश पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. रमेशच्या तोंडाच्या बाजूलाच अधिक चावा बिबट्याने घेतला होता. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. हेमंत चौधरी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचार केलेत. परंतू दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. शनिवार (दि. २९) सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू झाला. दरम्यान, बिबट्याने पाच दिवसांत एका मागोमाग तीन बालकांवर हल्ला चढवला. त्यात दीदी, स्वामीनंतर रमेशही बिबट्याचा बळी ठरला आहे. याप्रकरणी नानसिंग डुडवे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतले तीन बालकांचे बळी !

यापूर्वी नरभक्षक बिबट्याने नंदाळे बुद्रुक येथील ८ महिन्याची दिदि शिवराम पावरा व बोरकुंड येथील हार्दिक दीपक रोकडे (वय ५) या दोघांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. मानवी रक्ताची चटक लागलेल्या बिबट्याने बोरी परिसरात धुमाकूळ घातला असून त्याची दहशत निर्माण झाली आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी दिवसरात्र ५० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले असून पिंजरे, ट्रप कॅमेरे, ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. मात्र, बिबट्या अद्यापही मोकाट आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवाई देवराई’ जैन ठिबकने बहरले !

February 17, 2024

धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

December 6, 2024

पत्नीला हनिमूनला घेऊन गेला अन् तिथेच थंड डोक्याने तिचा काढला काटा !

February 14, 2022

उद्योगपती मल्ल्या कंगाल; वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group