नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून, त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.
ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाऱ्या हालचालींना वेग आलेला असतानाच भारतात आता आरोग्य मंत्रालयापुढं आणखी एक आव्हान उभं राहू लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुळात हे आव्हान उभं राहण्यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठकही बोलवल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये निरीक्षणादरम्यान कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार उघड झाल्यामुळं सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्याच्या घडीला ब्रिटनमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.