धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील एकलव्य संघटनेच्या मुख्य सदस्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. दरम्यान, ना. पाटील यांच्या कामांचा धडाका पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून सामाजिक विकास करण्याची इच्छा असल्याचे प्रतिपादन यावेळी सोपान भिल यांनी केले.
यावेळी सोपान श्रावण भिल्ल, माजी ग्रामपंचायत सदस्य ताराचंद वारू भिल्ल, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय एकनाथ भिल्ल, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू श्रावण भिल्ल, रवींद्र हिलाल भिल्ल, तातू ताराचंद भिल्ल, विजय पुंजू कोळी, प्रमोद देवराज धनगर, कालू नगीन भिल्ल, आत्माराम धोबी आदी एकलव्य संघटनेच्या मुख्य लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ओबीसी जिल्हाप्रमुख मुकुंद ननवरे, कृउबा समिती संचालक प्रेमराजभाऊ पाटील, (बांभोरी) तसेच माजी पंस सदस्य प्रेमराजभाऊ पाटील (सोनवद), धरणगाव तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत बराटे, युवा सेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे, मागासवर्गीय सेना उपतालुका अध्यक्ष मोहन शिंदे आणि युवा सेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी यांच्या उपस्थितीत आणि सहकार्यात प्रवेश सोहळा पार पडला.