चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिरापूर येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षातमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये हिरापूरचे माजी उपसरपंच व माजी विकासो चेअरमन विजय निकुंभ (गोटू पैलवान), तसेच माजी ग्रा.पं. सदस्य दीपक देवरे व सहकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र मांडे आदी उपस्थित होते.