TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव भाजपच्या व्हाट्सअप ग्रुपमध्येच खासदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला विरोध?

चाळीसगावसह जळगाव लोकसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील भाजपच्या अनेक व्हाट्सअप ग्रुपमध्ये खासदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला उघड विरोध होत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. चाळीसगाव भाजपच्या काही ग्रुपमधील चॅटिंग उघड झाली असून त्यात असा खासदार पुन्हा नको, अशा आशयाचा मजकूर एका भाजपच्या लोकप्रतिनिधीने टाकला होता. त्याला काहींनी समर्थन दिल्याचे दिसून आले आहे. यामुळे चाळीसगावसह जळगाव लोकसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले आहे.

राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. परंतू त्यांना चक्क स्वतःच्याच तालुक्यातून विरोध होत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हा विरोध विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याने नव्हे तर, भाजपातूनच झाल्याचे समोर आले आहे. ‘चाळीसगाव भाजप परिवार’ आणि ‘चाळीसगाव भाजप शिलेदार’ या दोन व्हाट्सअपमध्ये आज उन्मेष पाटील यांना कथितरित्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये एका खाजगी कंपनीने आपल्या सर्वेक्षणात स्थान दिल्याची माहिती प्रसारित करण्यात आल्याचे कळते.

READ ALSO

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

यानंतर लोंढे ग्रामपंचायतचे सदस्य, विकासो सदस्य तसेच युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी संबधित दोघं व्हाट्सअपमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे. निवृत्ती जाधव यांनी यांनी कडवट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाच वर्षात ५ लाख सोडा ५ रुपयाचा सुद्धा निधी दिला नाही. स्वतःने स्व:ताची वाहवाह करू नये. तसेच खासदार साहेब, तुम्ही स्वतःला विचारा… तुमच्या गावात…परिसरात म्हणजे दरेगाव, रामनगर विसापूर कृष्णापुरी पिंपळवाडी, लोंढे, पळासरे, चिंचगव्हाण येथे तुम्ही दहा वर्षांमध्ये मंगेशदादांनी दिला एवढा निधी कधी दिला का?, गाव शिवचा विकास न करणारा माणूस जिल्ह्याचा काय विकास करणार?, असा खासदार परत नको, अशी आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशा भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टवर अनेकांनी सूचकरित्या आपले समर्थन दिले आहे. चक्क भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ग्रुपमध्ये खासदार उन्मेष पाटील यांच्या बद्दल नाराजी व्यक्त होत असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगाव दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याचवेळी नेमका जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बाबत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

– माझ्या मनातील दाटलेल्या भावना मी व्यक्त केल्या आहेत. कुणाबद्दलही आकस असण्याचे कारण नाही. परंतू मी माझ्या भावना पक्षाच्या नेत्यांसमोर नाही मांडायच्या तर कुठं मांडायच्या?, अनेक दिवसापासून साठवून ठेवले होते, ते बोललो !
– निवृत्ती जाधव (लोंढे ग्रामपंचायतचे सदस्य, विकासो सदस्य तसेच युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष)

– मी ती पोस्ट बघितली आहे. परंतू पक्ष शिस्त असल्यामुळे तुमच्याकडे अधिकृत प्रतिक्रिया देणार – नाही. नेता हा कार्यकर्त्यांना घडवत असतो. पण कार्यकर्त्याकडे पाठ फिरवल्यावर संतप्त भावना व्यक्त होणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे दोघं ग्रुपवर आलेल्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत तात्काळ पोहोचवल्या आहेत. प्रतिक्रिया गैर असल्याचेही म्हणता येणार नाहीत. पण योग्य वेळी मी देखील जिथं व्यक्त व्हायचं तिथं व्यक्त होईल, हे खात्रीने सांगतो !
– दोघं ग्रुपमधील एक सामाईक सदस्य तथा भाजप पदाधिकारी (नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेली प्रतिक्रिया)

 

तुम्ही सांगताय तशी गोष्ट अद्याप माझ्या वाचण्यात आलेली नाही. कुणाची कामांसंबंधित मागणी वजा अपेक्षा असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कामांची पूर्तता केली जाईल. मी लोंढे गावासह पंचक्रोशीत विविध विकास कामांसाठी ८० कोटींचा निधी दिला आहे.

– खासदार उन्मेष पाटील (जळगाव लोकसभा मतदार संघ)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 28 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

December 17, 2021

भडगावात अनोखी चोरी ; चोरट्याने शासकीय कार्यालयातून थांबविल्या कागदी फाईल

February 11, 2022

धरणगावजवळ अपघात; एक जण जागीच ठार !

January 24, 2022

अमळनेर तालुक्यातील पातोंड्यात शिक्षकाने जपलाय अनोखा छंद !

December 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group