TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – सोशल मीडियावर फक्त टीका टिपणी न करता सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण डॉ. नितु पाटील यांनी त्यांच्या फेसबुकच्या पोस्टद्वारे जनसामान्यांसमोर मांडले आहे. जे फक्त सोशल मीडियावर दिवसभर फक्त गळड ओकत असतात, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा वास्तववादी लेख.…!

मी दि. 17 जून 2025 माझ्या मित्राच्या मुलाच्या नावामागे त्याच स्वतः चे नाव लागण्यासाठी काही तात्काळ उपाययोजना मिळावी,माहिती मिळावी यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. सदर पोस्ट वाचुन मला शिरसोली येथील श्री. राजूजी बारी यांचा फोन आला.त्यांनी मला माझ्या पोस्टला जोडून दुसरी एक उपकथा सांगितली. त्यानुसार,
सन 2000 मध्ये दोन ते अडीच वर्षाचा एक मुलगा मा.आ.श्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊस जवळ बेवारस अवस्थेत श्री. विजय तुकाराम झोपे यांना दिसून आला. त्याच्या आई-वडिलांविषयी विचारपूस केली असता, शोधाशोध केली असता लक्षात आले की आई-वडिलांनी त्याचा त्याग केला असावा. त्याला नाव विचारले असता त्याने ‘दादू’हे नाव सांगितले.
दादू हा 2000 पासून कोथळी गावात राहत असल्याने पुढे त्याचे नाव “दादू कोथळीकर’असे करण्यात आले.त्यावेळी गावातील विजय तुकाराम झोपे, अजय तुकाराम झोपे, दीपक मनोहर कोळी,नितीन प्रल्हाद चौधरी ,सुभाष पाटील ( माजी पोलीस पाटील )यांची त्याला मदत झाली.अनाथ असल्याने मुक्ताईनगर मधील आश्रम शाळेत तो राहू लागला आणि अनौपचारिक पणे माणुसकीच्या नात्याने आश्रम शाळा प्रशासनाने दादूला पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. पण कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ऍडमिशन झाली नाही कारण शालेय भरतीसाठी त्याकडे कुठलाही दाखला नव्हता.त्याच्या जन्माबाबत ग्रामपंचायत कार्यालय कोथळी आणि पोलीस स्टेशन मुक्ताईनगर इथे चौकशी केली असता कुठलीही नोंद दिसून आली नाही. ही बाब लक्षात घेत त्याने पोलीस पाटील संजय दिनकर चौधरी यांच्या सहाय्याने कोर्टामध्ये अर्ज करून मला/दादू योग्य ती जन्मतारीख मिळावी म्हणून अर्ज केला .संपूर्ण तपासाअंती प्रथम न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांनी दादू कोथळीकर यांची जन्म तारीख 14/04/2002 अशी करण्यात यावी, असे आदेश दिले.त्यानुसार त्याला जन्म दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले. दरम्यान त्याचे लग्न देखील झाले.
आता दादूला पुढील शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती,पण कुठलाच शालेय दाखला नसल्याने अडचण निर्माण होत होती. तेव्हा ती अडचण मी दूर करावी असे राजू भाऊ बारी यांनी मला सांगितले.
मी दादूशी संपर्क केला सर्व असलेले कागदपत्रे मागवली,त्यावर अभ्यास करत मी पत्र तयार केले. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी,मा. शिक्षणधिकारी,मा.बाल व महिला विकास अधिकारी आणि मा. समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क आणि पत्रव्यवहार केला.त्यानुसार मा.कल्पनाजी चव्हाण मॅडम,माध्यमिक शिक्षणाधिकारी स्वतः हा वरणगावला आल्यावर माझी भेट घेत सर्व चर्चा झाली.
सर्वांचं हेच म्हणणे होत,ही अशी पहिली घटना आहे.दादूचा कुठलाच शालेय दाखला नाही.पहिली,दुसरी काहीच नाही.त्याची भरती कशी होणार, कोणत्या वर्गात होणार.…(RTE अंतर्गत वय 16 पर्यंत इयत्ता 8 मध्ये भरती होता येते, दादू चे वय 23 कसं होईल?कोण जबाबदारी घेईल? शिवाय शालेय कागद पत्र नाही?)
तेव्हा 2 पर्याय,
1. शिक्षण मंत्री,मंत्रालय संपर्क
2.जनहित याचिका
मी मा.श्री. महेंद्रजी पवार ,पी.एस शिक्षणमंत्री यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी लगेच नाशिक बोर्ड संबंधित अधिकारी मा. अनिलजी देसले यांच्याशी संबंधित चर्चा केली. मला फोन आल्यावर मी सर्व माहिती देत मी श्री.सी. जी. तायडे मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव यांच्याशी बोलणे करून दिले.
आज दि.27 जून ला दादू कोथळीकरचा विद्यालय क्लार्क मा. श्री.भास्कर अप्पा यांच्या मदतीने मी स्वतः हा ऍडमिशन फॉर्म मध्ये सर्व माहिती आणि पालक म्हणूनच सही करत इयत्ता 8वी.मध्ये दादूला प्रवेश मिळाला असून शैक्षणिक मुख्य प्रवाहात सामील करत दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!
(खरं पाहता मी वयानुसार इयत्ता 10 वी साठी आग्रही होतो,पण RTE नुसार फक्त 8वी पर्यंत शालेय भरती होते,मला वाटतं असे जे अनेक दादू असतील तर लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत RTE चा परीघ वाढवण्यासाठी शिक्षण तज्ञ मंडळी सोबत सल्लामसलत करून एखादं नवीन कायदा करण्यात यावा)
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही अशी एक शालेय भरती असेल,ज्यात कुठलाही शालेय दाखला नाही,आहे ती फक्त प्रशासकीय सेवेचा शिक्षणा संबंधीचा त्वरित सकारात्मक प्रतिसाद,फक्त 10 दिवसांत निकाल आपल्या समोर आहे.
या कामी मला भरपुर प्रशासकीय अधिकारी वर्गाची मोलाची मदत झाली.यात,
मा. आयुष प्रसादजी,जिल्ह्याधिकारी,जळगाव
मा. योगेशजी पाटील,सहआयुक्त समाज कल्याण,
मा. कल्पनाजी चव्हाण मॅडम,शिक्षणाधिकारी,
मा.महेंद्रजी पवार,शिक्षण मंत्रालय,
मा. अनिलजी देसले,नाशिक बोर्ड
मा. हरीशजी भांबरे, नाशिक
मा. रोहिदासजी दोरकुळकर,नाशिक
मा. धनंजय खेवलकर,विधी सल्लागार,जळगाव
मा. पवन पाटील,जळगाव,
मा. योगेश मुक्कावार, औरंगाबाद,
मा. भागवत पाटील सर,वरणगाव आदी आदी या सर्वाच्या मदतीने हे शक्य झाले. सर्वांचे मी दादुच्या वतीने सविनय आभार व्यक्त करतो…!

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

डॉ. नितु पाटील,
वासुदेव नेत्रालय,वरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खोटे दस्तावेज बनवत जयश्रीराम पतसंस्थेस आर्थिक नुकसान; तिघांविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाचे चौकशीचे आदेश

December 28, 2020

आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बूस्टर’ डोस ; लसींच्या किमतीही घटल्या

April 10, 2022

धक्कादायक : मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे दिल्लीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू !

March 31, 2023

गावठी कट्ट्यासोबत खेळताना गोळी घुसली कपाळात ; अडीच वर्षीय बाळाचा मृत्यू !

August 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group