जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महासभेत उपमहापैार कुलभूषण पाटील आणि भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात वादंग निर्माण झाले. कैलास सोनवणे यांनी उपमहापौर व्यासपीठावर बसू शकतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
महासभेत उपमहापौर व्यासपीठावर बसल्याचा आक्षेप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी घेतला यावरून जळगाव महापालिका महासभेत गदारोळ झाला. सकाळी अकरा वाजता महासभेस प्रारंभ झाला, महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होते, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त राजेश कुलकर्णी व्यासपीठावर होते. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर व्यासपीठावर बसू शकतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून उपमहापौर कुलभूषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करीत तोडपाणी केल्याचा आरोप करण्यात आला यावरून सभेत वाद निर्माण झाला.